धनंजय मुंडेंवर आरोप करणार्‍या तरुणीविरुद्ध भाजपा नेत्याचा खळबळजनक खुलासा

मला 2010 सालापासून रेणू शर्मा त्रास देत होती
धनंजय मुंडेंवर आरोप करणार्‍या तरुणीविरुद्ध भाजपा नेत्याचा खळबळजनक खुलासा

मुंबई -

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणार्‍या तरुणीने मलाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा

प्रयत्न केला होता असा आरोप मुंबईतील भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

2010 सालापासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तेव्हा, मी माझ्या काही परिचयाच्या माणसांकडून तिची माहिती काढली. तेव्हा, रेणू शर्मा फसवणूक करते, हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवत असल्याची मला माहिती मिळाली असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.

तिने चार ते पाच वर्ष माझा पाठलाग केला. तिला तिच्या म्युझिक व्हिडिओसाठी पैसे हवे होते. म्हणून ती मागे लागली होती. सहा जानेवारी 2021 ला तिचा अखेरचा मेसेज आला. तुम्ही मला विसरलात का? असे तिने म्हटले होते. असे कृष्णा हेगडे म्हणाले.

काही दिवसातच धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी त्यांना ती महिला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. रेणू शर्मा सारखे जे लोक ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड झाला पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे म्हणून मी आज तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलो असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणार्‍या तक्रारदार महिलेने पुन्हा पोलीस ठाणे गाठलं, त्यावेळी पोलीस या प्रकरणात सहकार्य करत नसून तपास करणारी अधिकारी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आहे असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलाने केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com