विवाह सोहळे वाढवतोय संसर्ग; भाजप नेते हर्षवर्धन पाटील करोना पॉझिटिव्ह

विवाह सोहळे वाढवतोय संसर्ग; भाजप नेते हर्षवर्धन पाटील करोना पॉझिटिव्ह

मुंबई | Mumbai

भाजपचे (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह (Corona Test Positive) आल्याची माहिती त्यांनी स्वतः आपल्या ट्विटरवरून (Twitter) दिली आहे...

मुंबई येथे दि. २८ डिसेंबरला हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील (Ankita Patil) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुतणे निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांचा विवाहसोहळा पार पडला. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावली.

हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती. असे त्यांनी म्हटले आहे.

विवाह सोहळे वाढवतोय संसर्ग; भाजप नेते हर्षवर्धन पाटील करोना पॉझिटिव्ह
सत्ता स्थापनेसाठी भाजपची राष्ट्रवादीला होती ऑफर, पहाटेच्या शपथविधीवर खा. राऊत म्हणतात...

अंकिता आणि निहारच्या विवाहास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनादेखील करोनाची बाधा झाली आहे. काल (दि. २९) सुप्रिया सुळेंनी त्यांना करोना झाल्याची माहिती दिली होती. या विवाहसोहळ्यात हजेरी लावलेले नेते एकापाठोपाठ करोना पॉझिटीव्ह येत असल्याने आणखी काही लोक करोनाबाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com