
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी काल देण्यात आली होती. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन करून शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला होता. त्यानंतर आज धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
नारायण कुमार सोनी असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून, त्याला बिहारमधून ताब्यात घेतण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपी हा दहा वर्ष पुण्यात वास्तव्याला होता. या काळात त्याच्या पत्नीने त्याला सोडलं व दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं. मात्र शरद पवार यांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई न केल्यानं आपन त्यांना फोन करत होतो, असा दावा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीकडून करण्यात आला आहे.
या पूर्वीही याच व्यक्तीने पवारांना धमकी दिल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यालयातून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती आणि समजूत घालून सोडून दिले होते. आता पुन्हा एकदा त्याच व्यक्तीने धमकी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली