विनायक मेटे अपघात प्रकरणाबाबत मोठी अपडेट; सीआयडीने केली 'ही' कारवाई

विनायक मेटे
विनायक मेटे

मुंबई | Mumbai

शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती (Accident) मृत्यू प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. कार चालक एकनाथ कदम (Eknath Kadam) विरोधात रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत हा गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळत आहे. कदम याला लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सीआयडी मेटे अपघाती मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करत होती.

विनायक मेटे
'डॅडी'बाबत न्यायालयाने घेतला 'हा' मोठा निर्णय

विनायक मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरुन गेली होती तेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज सीआयडीकडून तपासण्यात आले. सीआयडीने पाहिलेल्या फूटेजमध्ये हा चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

विनायक मेटे
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित असूनही त्याने ओव्हरटेक केला. त्याचा परिणाम डाव्या बाजूला झाला आणि अपघात घडला. सीआयडीच्या तपासात या बाबीसमोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसांमध्ये कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com