एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा; ३०० कोटी वितरीत

ST Bus
ST Bus

मुंबई | Mumbai

जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी ((MSRTC) कर्मचाऱ्यांना पगार (Salary) झालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी (ST Employees) आक्रमक झाले आहेत...

आता राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी वितरीत करण्यात आले आहेत.

महाआघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले होते. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन करुनही त्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे.

ST Bus
Sinnar-Shirdi Highway Accident : मृतांची नावे आली समोर

सत्तारानंतरही राज्यात कुठलाही बदल झालेला नाही. पगार वाढ सोडा वेळेवर पगार होत नसल्याने एसटी कर्मचारी नाराज आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना 12 तारीख उलटून गेल्यानंतरही वेतन मिळाले नाही, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केला आहे.

ST Bus
सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात : मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

राज्य सरकारकडून न्यायालयात 7 तारखेदरम्यान पगार होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून न्यायालयाचा अवमान सुरु आहे.

ST Bus
सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, ३५ जखमी

शिंदे-फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी वितरीत करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com