मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता, निकाल कसा पहायचा? जाणून घ्या

मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता, निकाल कसा पहायचा? जाणून घ्या

मुंबई | Mumbai

राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्यानं रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

रद्द झालेल्या या परीक्षांचा निकाल जुलै महिन्यात लागणार असे संकेत राज्य शासनाकडून (Maharashtra government) देण्यात आले होते. त्यानुसार आता दहावीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, दहावीच्या निकालाबाबत अजूनही अधीकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ लवकरच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येईल.

असं होणार मूल्यांकन

दहावीचा निकाल लावताना ९ वी व १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय ०८ ऑगस्ट २०१९ नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा १०० गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष २०२०-२१ साठी इ.१० वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण देण्यात येतील. विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण देण्यात येतील.

असा पाहा निकाल

निकाल पाहण्यासाठी, www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org किंवा www.maharashtraeduction.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com