VIDEO : मुंबईत बसला अचानक आग; प्रसंगावधान राखत प्रवासी उतरल्याने मोठा अनर्थ टळला

VIDEO : मुंबईत बसला अचानक आग; प्रसंगावधान राखत प्रवासी उतरल्याने मोठा अनर्थ टळला

मुंबई | Mumbai

मुंबईत बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या वांद्रे येथे बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही. मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकाने बसमधून स्पार्क होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांने प्रसंगसावधाने सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आग लागली तेव्हा सगळ्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने सारे प्रवासी सुखरुप आहेत.

दरम्यान अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आगीनंतर बसचा सांगाडा शिल्लक राहिला. या दृघटनेत बेस्टचे मोठे नुकसान झाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com