एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ

ऊर्जा विभागाचा निर्णय, भरतीचा मार्ग मोकळा
मंत्रालय
मंत्रालय

मुंबई / प्रतिनिधी

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गातील घटकाला (एसईबीसी) खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) लाभ देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतलला आहे. या निर्णयामुळे महावितरणमधील पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऊर्जा विभागाच्या परिपत्रकामुळे विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता या पदासाठी
एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना आता ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे सरकारी नोकर भरती रखडली होती. सरकारने एसईबीसीच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऊर्जा विभागाने बुधवारी परिपत्रक जारी केले आहे.

महावितरण कंपनीने २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता या पदासाठी जाहिरात दिली होती. परंतु, मराठा आरक्षण स्थगितीमुळे ही भरती रखडली होती. आता महावितरणने ही भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com