बार्टीचा यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय

बार्टीचा यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सामाजिक न्याय विभागाच्या (Department of Social Justice) अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, (बार्टी) (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक २०० विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या ( UPSC Exams ) पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या आता १०० ने वाढवून ३०० करण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे(Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी घेतला आहे.

दरवर्षी बार्टी मार्फत विशेष चाचणी परिक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना दिल्ली येथे मोफत प्रशिक्षणासाठी निवडले जाते. दिल्ली येथे नामांकित प्रशिक्षण केंद्रात प्रवेश तसेच सदर उमेदवारांना निवास आणि भोजन व्यवस्था देखील बार्टी मार्फत पुरवली जाते.

मागील दोन वर्षात लॉकडाऊन काळात देखील उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत बार्टी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. बार्टीचे २०२० साली ९ तर २०२१ मध्ये ७ उमेदवार यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी बनले आहेत. हे लक्षात घेऊन प्रशिक्षणासाठी निवड होणाऱ्या विद्यार्थी संख्येत १०० ने वाढ केली असून, यावर्षी तब्बल ३०० विद्यार्थी यूपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण घेणार आहेत.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com