बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर

रिफायनरीचा प्रश्न चिघळला
बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर

रत्नागिरी | Ratnagiri

कोकणातील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

पंचक्रोशीतील ग्रामस्थ याठिकाणी दाखल झाले असून सर्वेक्षण थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर
Crime News : क्षुल्लक कारणावरुन वाद, दगडाने वार करून निर्घृणपणे संपवलं

यादरम्यान यामध्ये काही महिलाही जखमी झाल्याचेही समजत आहे. तर काही आंदोलनकर्त्यांना उष्माघातामुळे चक्करही आली. गेले दोन दिवस काहीसं शांत असलेलं बारसू पुन्हा पेटलं आहे. शेकडो पोलिसांचा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, बारसू येथे महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला.

बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर
वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आले. लोकांचा जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला.

बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर
APMC Election 2023 : राहुरीमध्ये मतदानावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस; मतदार, उमेदवार अन् निवडणूक यंत्रणेची उडाली धांदल

लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अश्रूधुर सोडले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृतीही ढासळली. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे माणसांची पळापळ झाली. अश्रू धुर सोडल्याने लोकांना चालता येत नव्हते. समोरचे दिसायचे बंद झाले. अनेकांच्या डोळ्यांना जळजळ सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वेक्षण स्थळावरून लोकांना हटवले.

कोणताही लाठीचार्ज नाही: CM शिंदे

दरम्यान, बारसूतील गोंधळानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगत आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश होता असा दावा केला आहे.

बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर
नगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्.... पाहा VIDEO

बारसूत सध्या शांतता आहे. बारसूत कोणातही लाठीचार्ज केला नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश आहे. बाहेरचे काही लोक आंदोलनस्थळी आल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणार नाही. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

बारसूतील लोकांचा गैरसमज दुर करणार. स्थानिकांच्या समंतीनेच हा प्रकल्प पुढे नेणार. जोरजबरदस्तीने हा प्रकल्प करणार नाही. ७० टक्के लोक रिफायनरी प्रकल्पाच्या बाजून आहेत. स्थानिकांनी शांतता राखावी. रिफायनरी झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळाणार. त्यांना प्रकल्पाचा फायदा समजावून सांगणार. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

आज स्थानिक खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून बारसूकडे जात असताना तिकडे जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते मात्र राऊत आपल्या भूमिकेवर ठाम होते. राऊत आंदोलकांना भेटण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी राऊतांनी रस्त्यातच ठाण मांडले. त्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

आंदोलकांकडून वणवा लावण्याचा प्रयत्न : उद्योगमंत्री उदय सामंत

अश्रुधाराचा वापर करण्यात आलेला नाही. आंदोलनकर्त्यांनी जो वणवा लावण्याचा प्रयत्न केला आहे तो विझवताना तो धूर येत आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. "हे स्थानिकांचे आंदोलन नाही. मला हात जोडून सर्वांना विनंती करायची आहे की तुमच्या मताच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांची डोकी भडकवू नका. माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे की आपण चर्चेसाठी तयार आहोत. प्रकल्पाला विरोध का आहे हे समजवून घेऊ. मातीचे परिक्षण झाले म्हणजे आज उद्या प्रकल्प येणार नाही. स्थानिकांचा विरोध कमी होत असताना काही लोकांनी पक्षीय राजकारणाला स्थानिकांचे रुप देऊन हे आंदोलन केले आहे, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com