विमान हवेत असताना वैमानिकाला आला हृदयविकाराचा झटका अन्…

विमान हवेत असताना वैमानिकाला आला हृदयविकाराचा झटका अन्…

नागपूर | Nagpur

एका प्रवासी विमानाला (Passenger plane) नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आपत्कालीन लँडिंग (Emergency landing) करावे लागल्याची आल्याची घटना समोर आली आहे. या विमानात १२६ प्रवाशी होते.

विमान आकाशात असताना वैमानिकाला हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्यामुळे बांगलादेशच्या विमानाचे (international flight of Biman Bangladesh) सहवैमानिकाने तातडीने नागपूरमध्ये लँडिंग केले. मस्कतहून ढाकासाठी उड्डाण केलेले विमान रायपूरच्या आकाशात असताना वैमानिकाच्या छातीत दुखू लागले. हृदयविकाराचा झटका आल्याची जाणीव होताच वैमानिकाने सहवैमानिकाला विमान नियंत्रित करण्यास सांगितले. सहवैमानिकाने तातडीने नागपूर एटीसीला (Air Traffic Control - ATC) संपर्क केला आणि निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली.

संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागपूर एटीसीने वैमानिकाला तातडीने नागपूर विमानतळावर उतरण्याची परवानगी दिली. विमान उतरण्याआधीच रुग्णवाहिक आणि वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले. विमान उतरताच वैमानिकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.को-पायलटने विमान नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. विमानातील सर्व प्रवासीही सुरक्षित आहेत. यानंतर विमानाच्या वैमानिकाला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

को-पायलट आणि एटीसीच्या समजुतीमुळे मोठा अपघात टळला. जर को-पायलटने योग्य वेळी माहिती दिली नसती आणि कोलकाता एटीसीने विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी (Emergency landing) परवानगी दिली नसती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.

भारतानं अलीकडेच बांग्लादेशी एअरलाइन्सला भारतासोबत विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. भारतातील कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे बराच काळ संबंधित विमान उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले होते. यानंतर दोन्ही देशांमधील हवाई प्रवासाला सरकारांनी परवानगी दिली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com