
मुंबई | Mumbai
पॅरीस (Paris) येथे २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (Olympic Games) महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील (Beed District) अविनाश साबळे (Avinash Sable) पात्र ठरला आहे...
अविनाश हा लांब पल्ल्याचा धावपटू (Runner) असून त्याने नुकतीच सिलेसिया डायमंड लीग २०२३ (Silesia Diamond League 2023) अॅथलेटिक्स मीटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. त्यामुळे आता त्याला जगभरातील क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेल्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (Paris Olympics) आवश्यक पात्रता पूर्ण करण्यात यश आले आहे.
नुकतेच पोलंड येथे पार पडलेल्या सिलेसिया डायमंड लीग २०२३ अॅथलेटिक्स मीटमध्ये अविनाशने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेचे अंतर ८.११.६३ इतक्या वेळेत पूर्ण करत सहावे स्थान पटकावले. यामुळे त्याला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आता पॅरीस येथे २०२४ मध्ये होणाऱ्या अॅथलेटिक्स स्पर्धेत (Athletics Competition) अविनाश सहभागी होणार आहे.
दरम्यान, अनिवाश साबळे याने यापूर्वी टोकियो (Tokyo) येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (Commonwealth Games) सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर आता पॅरीस येथील स्पर्धेसाठी अविनाशची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.