अखेर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द

आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला यश
अखेर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द

औरंगाबाद - Aurangabad :

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी औरंगाबाद शहरातील इयत्ता 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली असून राज्याचे सह सचिव राजेंद्र पवार यांनी यासंबंधितचे पत्र शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना पाठवले आहे.

औरंगाबाद शहरातील इयत्ता 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपूरावा करीत होते. अखेर आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी 4 मार्च 2021 रोजी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन सदरील प्रवेश प्रकि‘या रद्द करण्याची मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली होती.

सभागृहात प्रश्न उपस्थित करताना इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी असून विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही तर महाविद्यालयांना देखील विद्यार्थी मिळत नाही. मागील चार वर्षांतील औरंगाबाद शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात सन 2017-18 मध्ये 50 टक्के, 18-19 मध्ये 51 टक्के, 19-20 मध्ये 60 टक्के तर 20-21 मध्ये 45 टक्के विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी आकडेवारीसह सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.

याउलट ग्रामीण भागामध्ये महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेश क्षमता कमी असून देखील त्याठिकाणी दुप्पट प्रवेश होत आहे. परिणामी शहरातील प्रवेश पूर्ण क्षमतेने न झाल्याने शिक्षक देखील अतिरिक्त होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले होते. त्यामुळे औरंगाबाद शहरातील 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली होती.

आ.सतीश चव्हाण दोन वर्षांपासून माझ्याकडे यासंदर्भात पाठपूरावा करीत आहेत, आगामी काळातील कोरोनाची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात सांगितले होते.

राज्याचे सह सचिव राजेंद्र पवार यांनी यासंबंधितचे पत्र शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना पाठवले असून यात पत्रात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक या ठिकाणी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकि‘या राबविण्यात यावी असे म्हटले आहे.

या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबादला वगळण्यात आले आहे. त्यामुळे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी औरंगाबाद शहरातील महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश ऑफलाईन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com