औरंगाबाद - Aurangabad :

2 अब्ज रुपयांचा अपहार करण्याच्या तयारीत असलेल्या एएम न्यूज चॅनलचे व्यवस्थापक परमजित संधू, राजेश शर्मा सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असताना आज एएम न्यूजच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरापासून मिळत नसलेल्या पगाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

एम न्यूजच्या कर्मचाऱ्यांचा पगार मार्च 2020 पासून थकला आहे. कोरोनाच्या संकटकाळात काम करूनही पगार देण्यात आला नाही.

त्यामुळे आज कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन व्यवस्थापनाची तक्रार केली.

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांनी याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्याकडेही निवेदन सादर केले आहे.

व्यवस्थापनाकडून तर्कशुद्ध प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचा-यांनी निवेदनाचा मार्ग निवडला आहे. लोकप्रतिनिधींना भेटून यासाठी व्यवस्थापनाला समज द्यावी असे निवेदन कर्मचारी करणार आहेत.

संपूर्ण लाॅकडाऊनमध्ये कर्तव्य बजावून देखील अद्याप व्यवस्थापन स्पष्ट प्रतिसाद देत नसल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. कायदेशीर मार्गाने दाद मागण्यासाठी विचार सुरू आहे.