औरंगाबाद - Aurangabad - प्रतिनिधी :

करोना संसर्गकाळातच अचानकपणे राज्यातील परभणी जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा फैलाव झाल्याचे समोर आल्याने मोठे संकट आले आहे.

माझ्या वतीने जनतेने काळजी घ्यावी अशी विनंती असून लवकरच राज्यात 'हाय अलर्ट' घोषित करण्यात येणार आहे, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिले. एका खासगी कार्यक्रमासाठी ते जालना येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपण लवकरच लसीकरण सुरू करणार असतानाच राज्यासमोर बर्ड फ्लूच्या रूपाने नवे संकट आले आहे.

राज्यातील पाच जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा फैलाव झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

'बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यू दर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता 'बर्ड फ्लू'बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

त्यासाठी राज्यात हाय अलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू करायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.

शिवाय राज्यात येत्या १६ जानेवारीपासून आधी ठरल्याप्रमाणे लसीकरणास सुरुवात होणार आहे. दररोज १० हजार कर्मचाऱ्यांना करोनाची लस दिली जाणार आहे.

कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस राज्याला मिळेल हे एक-दोन दिवसांत कळेल, असेही राजेश टोपे यांनी नमूद केले.