कोकण पूरग्रस्तांसाठी औरंगाबादकारांची 'सेवा'

किराणा सामानाच्या ५७५ कीट रवाना
कोकण पूरग्रस्तांसाठी औरंगाबादकारांची 'सेवा'

औरंगाबाद - Aurangabad :

कोकणातील महापूरात नुकसान झालेल्या नागरीकांच्या मदतीसाठी औरंगाबादचे "सेवा फाऊंडेशन' सरसावले आहे. फाऊंडेशनने पाली, कराड आणि चिपळूनमध्ये किराण्याच्या १९ वस्तूंचा समावेश असणाऱ्या ५७५ कीटसह भांडे, कपडे आणि जीवनोपयोगी साहित्य पाठवले आहे.

शनिवारी रात्री मदतीचा ट्रक कोकणासाठी रवाना झाला. रविवार ते मंगळवार दरम्यान या साहित्याचे वाटप केले जाईल.

कोकणातील महापूरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण केवळ पर्यटनासाठी नसून संकटाच्या काळात कोकणवासीयांना मदत करणे आपली जबाबदारी असल्याची भूमिका सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मांडली.

"आपलं कोकण, आपली माणसे' या उपक्रमाच्या माध्यमातून मदत साहित्यासाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत फाऊंडेशनच्या सदस्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला.

५७५ कुटूंबांना किराण्याची कीट

फाऊंडेशनने गहू, तांदूळ, तूरदाळ, साखर, चहापत्ती, गोडतेल, बिस्कीट, नूडल्स, साबण, टूथपेस्ट, ब्रश याच्यासह १९ वस्तूंचा समावेश असणारे ५७५ बॉक्स तयार केले. याशिवाय भांडे, नवा कोऱ्या साड्या, कपडे, शर्ट, पँट असे साहित्य गरजंूपर्यंत पोहचवले.

वंचित गावात मदत

पूरग्र्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत सुरू झाली आहे. मात्र, अनेक गावे अजूनही वंचित आहे. फाऊंडेशनने अशा गावांची माहिती मिळाली. त्यातून सातारा जिल्ह्यातील कराड, पाली आणि चिपळूणमधील शंकरवाडी, खेर्डी, वडार कॉलनी, पेठमाप, सती या ठिकाणी मदत पोहचवण्याचे ठरवले.

यांचे मिळाले सहकार्य

सुमित खांबेकर, नितीन महाजन, प्रतीक गायकवाड, शेखर पाटील, गणेश तुपे, आशिष भालेराव, आमिर खान, स्वाती डिडोरी पाटील, नेहा गुंडेवार, जय वावरे, सुजीत तेंगुरे, विजय वावरे, राहुल टेटवार, शुभम लोहाडे, आशिष पावडे, समीर पाटोळे, गजानन गोमटे, शैलेश पवार आदी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com