औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

अत्यंत साधेपणाने रंगला सोहळा
औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

औरंगाबाद - Aurangabad :

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

करोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाचे या संदर्भातील नियम पाळुन अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com