"मी आज जाणार आहे..." सांगत महिला डॉक्टरने घेतला गळफास

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळाने होती तणावात
"मी आज जाणार आहे..." सांगत महिला डॉक्टरने घेतला गळफास

औरंगाबाद - Aurangabad :

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत असल्याने तणावात राहत असलेल्या एका महिला डॉक्टरने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कांचनवाडी परिसरात ही घटना उघडकीस आली. डॉ. प्रियंका क्षीरसागर (वय ३०) असे त्यांचे नाव आहे. त्यांचे पती डॉ. प्रमोद क्षीरसागर घाटीत (एम.डी. मेडिसीन) डॉक्टर आहेत.

कांचनवाडी परिसरातील ग्रँड कल्याण सोसायटीत क्षीरसागर कुटुंब राहते. प्रियांका यांनी गळफास घेतल्याचे सकाळी समजल्यानंतर डॉ. प्रमोद यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारांसाठी घाटीत दाखल केले.

तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाइड नोट जप्त केली असून त्यात त्यांनी, 'माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार ठरवू नये', असा उल्लेख केला असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.

दरम्यान, प्रियंका या नगर जिल्ह्यातील असून प्रमोद यांच्याशी त्यांचा साडेचार वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपासाला सुरुवात केली आहे.

प्रमोद यांची परीक्षा सुरू असल्याने ते सकाळपर्यंत अभ्यास करीत होते. सकाळी सातच्या सुमारास प्रियंका, 'मी आज जाणार आहे,' असे सांगत एका खोलीत गेली आणि दोरीने गळफास घेतला. मुलगा दाराजवळ रडत असल्याने प्रमोद यांनी घरात पाहिले तेव्हा ती न दिसल्याने शोध सुरू केला. तेव्हा पाठीमागील खोलीत तिने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com