औरंगाबाद जिल्ह्यात 5,12,611 जणांचे लसीकरण

औरंगाबाद जिल्ह्यात 5,12,611 जणांचे लसीकरण

लसीकरणाची गती वाढवणार

औरंगाबाद - Aurangabad :

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 512611 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असून 13 मे रोजी एकूण 9928 जणांनी लस घेतली.

यामध्ये ग्रामीण भागातील 4352 जणांनी तर शहरात 5576 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

13 मे 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 197340 जणांनी पहिला डोस घेतला तर 39380 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 236720 जणांचे लसीकरण झाले आहे.

तर शहरामध्ये 205188 जणांनी पहिला डोस घेतला तर 70703 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 275891 जणांचे लसीकरण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com