दुर्दैवी... औरंगाबादमध्ये एका महिन्याच्या बाळाचा करोनाने मृत्यू

पावरी गावावर शोककळा 
दुर्दैवी... औरंगाबादमध्ये एका महिन्याच्या बाळाचा करोनाने मृत्यू

औरंगाबाद - Aurangabad :

सोयगाव तालुक्यातील पावरी गावातील अवघ्या एका महिन्याच्या कोरोना बाधित बाळाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

या बाळासह जिल्ह्यात २६ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबळींची संख्या २ हजार ४२७ वर पोहचली आहे.

त्याच वेळी जिल्ह्यात ९५८ नवे बाधित आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या एक लाख २० हजार ५६६ वर पोहचली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या एक लाख पाच हजार ६४१ वर पोहचली आहे.

सध्या जिल्ह्यात १२ हजार ४९८ करोना बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान, सोयगाव तालुक्यातील पावरी गावातील अवघ्या एका महिन्याच्या करोना बाधित बालकाला २१ एप्रिलला घाटीत दाखल करण्यात आले होते.

श्वसनविकार, न्यूमोनिया, मेंदूविकार आणि अन्य गंभीर गुंतागुंतीमुळे संबंधित बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com