घराबाहेर न पडणार्‍या महिला सुरक्षित; पुरूषच जास्त बाधित !

सर्वाधिक रुग्ण 18 ते 50 वर्षे वयोगटातील
घराबाहेर न पडणार्‍या महिला सुरक्षित; पुरूषच जास्त बाधित !

औरंगाबाद - Aurangabad :

आजवर औरंगाबाद शहरात आढळलेल्या करोना रुग्णांत पुरूषांची संख्या अधिक दिसून येत आहे. त्यातुलनेत करोना संसर्गाच्या काळात कामाशिवाय घराबाहेर न पडणार्‍या महिलाच सुरक्षित राहत आहे.

मागील तेरा महिन्यांत शहरात 74 हजार 133 जणांना कोरोनाची बाधा झाली. यात 45 हजार 767 पुरुष तर 28 हजार 366 महिलांचा समावेश आहे.

मागील वर्षी 2020 मध्ये मार्च महिन्यात शहरात कोरोना संसर्ग सुरू झाला. तेव्हापासून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वांरवार केले जात आहे. तसेच घरीच राहा सुरक्षित रहा, असा संदेश दिला जात आहे.

मात्र घराबाहेर कामानिमित्त पडणार्‍यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाची अधिक लागण होत आहे.

पालिकेकडून प्राप्‍त झालेल्या अहवालानुसार मागील 13 महिन्यात शहरात एकूण 74 हजार 133 जण पॉझिटिव्ह आढळले. यात 45 हजार 767 पुरुषांचा समावेश आहे.

शहरातील आजवरच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण 18 ते 50 वर्षे वयोगटातील आहेत. या वयोगटातील 44 हजार 644 जण आत्तापर्यंत पॉझिटिव्ह निघाले.

करोना संसर्ग सुरू झाल्यापासून हा आकडा वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com