औरंगाबाद जिल्ह्यात आजवर 606 जणांचा करोनाने मृत्यू
महाराष्ट्र

औरंगाबाद जिल्ह्यात आजवर 606 जणांचा करोनाने मृत्यू

Sandip Tirthpurikar

औरंगाबाद - Aurangabad - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील 26 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19284 एवढी झाली आहे.

त्यापैकी 14452 रुग्ण बरे झाले तर 606 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4226 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

मनपा (22)

त्रिवेणी नगर (1), अन्य (3), आंबेडकर नगर, चिकलठाणा (1), शहागंज (1), बेगमपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (1), आनंद नगर (1), मुकुंदवाडी (2), साईदर्शन अपार्टमेंट, जाधववाडी (2), एन नऊ, सिडको (2), लक्ष्मी नगर (1), प्रगती कॉलनी, टाऊन हॉल (2), मारोती नगर (2), एन अकरा सिडको (1)

ग्रामीण (04)

नवजीवन कॉलनी, कन्नड (1), नारळीबाग, सोयगाव (1), रांजणगाव (1), निल्लोड, सिल्लोड (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत बजाज नगर, वाळूज येथील 95 वर्षीय स्त्री, घाटी परिसरातील 52 वर्षीय पुरूष, दर्गा रोड परिसरातील 56 वर्षीय पुरूष आणि सोयगावातील जंगला तांडा येथील 50 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com