एकांतवासात पडलेेल्या सुलतानपूरवासीयांना 'आस्था'चा आधार !

...पोहचवला महिनाभराचा किराणा
एकांतवासात पडलेेल्या सुलतानपूरवासीयांना 'आस्था'चा आधार !

औरंगाबाद Aurngabad :

पाचोड तालुक्यातील सुलतानपूर गावात करोनामुळे एकांतवासात पडलेल्या ज्येष्ठ नागरीकांची आबाळ सुरू होती.

दुकाने बंद आणि कोणी मदतीलाही तयार नसल्याने जेवायचे हाल होत होते. ही बाब लक्षात आल्याने औरंगाबादच्या आस्था जनविकास संस्थेने गावात मदतीचा हात दिला.

करोना बाधितांसाठी किराणा सामानाची सोेय केली. यामुळे विलगीकरणाच्या १४ दिवसासोबतच पुढील काही दिवस त्यांची जेवणाची समस्या सुटली आहे.

ही मदत घेतांना गरजूंचे डोळे पाणावले.औरंगाबादहून ६५ किलोमीटरवरील पाचोड तालुक्यातल्या ३०० उंबरठ्याच्या सुलतानपूर गावात ३० कुटूंबातील ६३ जण कोरोना पॉझीटीव्ह झाले. पैकी बहुतांशी ज्येष्ठ नागरीक आहेत.

त्यांना १४ दिवसांसाठी शेतात तर काहींना गावात ठेवण्यात आले. तहसिलदारांनी गावात कंटोनमंेट झोन जाहिर केल्याने दुकाने बंद होती.

संसर्गाच्या भीतीने बाहेरचे तर दूर घरातले सदस्यही मदतीला तयार नव्हते. घरातल्या होता-नव्हता किराणा संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

ही बाब समजल्याने औरंगाबाद येथील आस्था जनविकास संस्थेच्या अध्यक्षा आरतीश्यामल जोशी यांनी ग्रामस्थांना मदत पोहचवण्याचा निर्णय घेतला. रविवारी किमान २०-२५ िदवस पुरेल एवढा किराणा ३० कुटूंबियांना वितरीत करण्यात आला.

यात गव्हाचे पीठ, तूरदाळ, तांदूळ, गोडतेल, बेसन, साखर, चहापत्ती, मीठ, हळद, तीखट, जीरे, मोहरी, तेल, मसाला रस्सम आणि लोणचे याचा समावेश हाेता.

करोना संंसर्ग पसरू नये याची काळजी घेत आस्थाच्या सदस्यांनी किराणाचे कीट वाटपाची मोहिम पार पाडली. ध्यानीमनी नसतांना किराणा मिळाल्याने आजी-आजोबांचे डोळे पाणावले. आता १४ दिवसच नव्हे तर महिनाभरही एकांतवासात राहण्याची सोय झाली, असे १४ दिवसांच्या क्वारेंटाईनमधून बाहेर आलेल्या साखराबाई म्हणाल्या. ग्रामस्थांनी आस्थाच्या सदस्यांना भरभरून आशिर्वाद दिले. गरजूंपर्यंत मदत पोहचवण्यासाठी माजी सरपंच आजीनाथ दौंड सर, शरद दौंड यांचे सहकार्य मिळाले.

उपक्रमासाठी आस्थाला तांबोळी गृह उद्योगाचे संचालक शशांक आणि शितल तांबोळी, अविनाश खांबेकर, अंजली देशमुख, यामिनी आसर, ज्योत्स्ना पुजारी, अनुराधा कामथ, आरती पाटणकर, रविंद्र पाटणकर, गीता जोशी, सुषमा मोरे, सुषमा गोटूरकर, अश्विनी जहागीरदार, मंजिरी जहागिरदार, प्रणिता देशपांडे, लीना जोशी, अंजू मुळे, ज्योती करमासे, वैशाली सदगुले, शलाका बकरे, विद्या पाटील, अर्चना देवगिरीकर, विजय रणदिवे, अनंत काळे, सुशिला त्रिभुवन, संजय बरीदे, तनुजा कोलते, सुषमा नाईक, माधवी कुलकर्णी, विजय देऊळगावकर, स्वाती मोटे यांनी सहकार्य केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com