अँटीजन टेस्टिंग कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

अँटीजन टेस्टिंग कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद

सीएमआयए, मसिआ आणि सीआयआयचा उपक्रम

Sandip Tirthpurikar

औरंगाबाद- Aurangabad - प्रतिनिधी :

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए), मरठवाडा असोशिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मसिआ) आणि कॉनफिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या तर्फे गुरुवारी (१३ ऑगस्ट) एक दिवसीय कोरोना अँटीजन टेस्टिंग कॅम्पचे आयोजन मराठवडा ॲटो क्लस्टर, आणि मरठवाडा असोशिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर (मसिआ) वाळूज येथे करण्यात आले होते.

या उपक्रमात वाळूज स्थित विविध औद्योगिक घटकांत कार्यरत असणाऱ्या एक हजार लोकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. हा कॅम्प यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सीएमआयएचे उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मानद सचिव सतिश लोणीकर तसेच औरंगाबाद महानगर पालिकेचे अधिकारी मोईन व त्यांचे सहायक उपस्थित यांनी विशेष प्रयत्न केले. अशा प्रकारचे कॅम्प औद्योगिक परिसरात आयोजित करण्यास औरंगाबाद महानगर पालिकेची टीम सुसज्ज आहे. या उपक्रमामुळे औद्योगिक घटकांमध्ये तसेच कार्यरत लोकांमध्ये कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली.

याप्रसंगी सीएमआयएचे अध्यक्ष, कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सतिश लोणीकर मानद सचिव तसेच रमण अजगांकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com