“येशूचे रक्त म्हणून...”; धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

“येशूचे रक्त म्हणून...”; धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

पुणे | प्रतिनिधि

धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार आळंदीमध्ये समोर आला आहे. एका महिलेने धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या असे सांगून लाल रंगाचे द्रव्य कुटुंबाला दिले असल्याचे समोर आले आहे. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“येशूचे रक्त म्हणून...”; धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

या प्रकरणी उद्धव कांबळे (वय ४८ वर्षे, रा. पद्मावती रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुधाकर सूर्यवंशी व इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील म्हणाले, की फिर्यादी हे त्यांच्या परिसरात राहणाऱ्या महादेव गवळी यांच्या घरी गेले असता त्यांनी पाहिले, की एका महिला त्या घरातील लोकांना छोट्या ग्लासमधून लाल रंगाचे द्रव्य हे येशूचे रक्त असल्याचे सांगत होती व त्यांना ते प्यायला सांगत होती. अनेकांनी तो द्राक्षाचा रस असून प्यायल्याचे म्हंटले आहे.

“येशूचे रक्त म्हणून...”; धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार
धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली

तसेच, धर्म परिवर्तनाबाबत विचारले असता त्याबाबत आमची चौकशी सुरू आहे असे त्यांनी सांगितले. या धर्म परिवर्तन करण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका महिलेने हातात ट्रे घेतला असून त्यामध्ये ५-६ छोटे ग्लास आहेत. या ग्लासमध्ये लाल रंगाचे द्रव्य आहे. ती महिला ते द्रव्य घरातील महिला व व्यक्तींना ते येशूचे रक्त असल्याचे सांगून त्यांना प्यायला सांगत असल्याचे दिसून येत आहे.

“येशूचे रक्त म्हणून...”; धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार
महापालिकेत जोरदार राडा; आप आणि भाजपचे नगरसेवक भिडले, पाहा VIDEO

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com