वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षण स्थगितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय
महाराष्ट्र

वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षण स्थगितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशातील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशातील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला असून, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे अशी माहिती मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशातील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीनंतर चव्हाण यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीच्या दरम्यान आणि जो सुनावणीचा शेवट झाला. त्यामध्ये एक समाधानाची बाब अशी की, याचिकाकर्त्यांनी सातत्यानं मेडिकल प्रवेशासंदर्भामध्ये अंतरिम स्थगिती मिळावी, अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारचे अंतरिम आदेश देणार नाही.

स्थगिती आम्ही देणार नाही. आणि मूळ आरक्षणाचं जे प्रकरण आहे, त्यासंदर्भात नियमित सुनावणी 27 जुलैपासून सुरू करायची अशाप्रकारचा निर्णय आज न्यायालयानं घेतला आहे. त्यामुळे अंतरिम स्थगिती मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही अतिशय समाधानाची बाब आहे. ज्यांनी मेडिकलला प्रवेश घेतले आहेत, त्यांच्याकरिता आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यामध्ये निर्माण झालेला नाही. ही मोठी समाधानाची बाब आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com