आषाढी वारीची घोषणा

आषाढी वारीची घोषणा

पुणे | Pune

देहू संस्थांनने आषाढी वारीची घोषणा केली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूर मध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार असून 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची घोषणा आज (रविवारी) झाली. यंदा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. करोना ओसरल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. आषाढी वारीची घोषणा झाल्यामुळे वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.