पंढरपूरमध्ये कडक संचारबंदी लागू

पोलिसांचा फौजफाटा तैनात
पंढरपूरमध्ये कडक संचारबंदी लागू
संग्रहित

पंढरपूर / Pandharpur - करोना संकटामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही वारकर्‍यांविना आषाढी यात्रा भरवली जात आहे. गर्दी टाळून केवळ प्रातिनिधिक स्वरूपात यंदाही जिल्हा प्रशासनाने यात्रेचे नियोजन केले आहे. आज सकाळपासून पंढरपूरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आषाढी एकादशी 20 जुलै रोजी आहे. प्रतीकात्मक पद्धतीने हा सोहळा साजरा होणार आहे. दहा मानाच्या पालख्यामधील वारकर्‍यांना व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला पंढरपूर शहरामध्ये प्रवेश असणार नाही.

आज सकाळी संचारबंदी सुरू झाल्यापासून पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकॅडींग टाकून बंद करण्यात आलेले आहेत

या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून प्रदक्षिणा मार्गावर ही पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. चंद्रभागा नदी कडे जाणारे रस्ते टाकून बंद करण्यात आलेले आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता पंढरपूर मध्ये इतर सर्व स्थापना संचारबंदी च्या काळामध्ये बंद असणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक सलग दुसर्‍या वर्षी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी येणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. वारकर्‍यांविना भरणार्‍या यात्रेच्या बंदोबस्तासाठी सुमारे 2 हजार 700 पोलिसांचा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे.

पंढरपूर आणि आजूबाजूच्या गावांमधून सुमारे चारशे ते साडेचारशे मठ, धर्मशाळांची सात दिवसांपासून पोलिसांकडून पाहणी केली जात आहे. सर्व मठाधिपतींना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दुपारी चार वाजेपासून पंढरपुरातील एसटीची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. 25 जुलै रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पंढरपूर एसटी आगाराला आर्थिक फटका बसणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com