Cyclone Asani : 'असनी'चा परिणाम महाराष्ट्रावरही

Cyclone Asani : 'असनी'चा परिणाम महाराष्ट्रावरही
File Photo

मुंबई | Mumbai

रविवारी संध्याकाळी बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळाचं (Cyclone Asani) रुपांतर तीव्र चक्री वादळात झालं आहे.

याच दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (Indian Meteorological Department) माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा (Hurricane) मार्ग बदलला आहे. ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळी पावसाला सुरुवात झाली आहे.

तसेच असनीचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर देखील होणार आहे. त्याबाबत हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

राज्यात कोकणात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीत देखील ढगाळ वातावरण आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.