पतसंस्थांनी जिल्हानिहाय स्थैर्य निधी उभारावा

सहकार मंत्री जयंतराव पाटील राज्यातील पतसंस्थांना आवाहन केले
पतसंस्थांनी जिल्हानिहाय स्थैर्य निधी उभारावा

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या समवेत करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या कालावधीत राज्यातील पतसंस्थाना आलेल्या अडचणी आज सहकार मंत्री जयंतराव पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाणून घेतल्या.

पतसंस्थाना एका वेब पोर्टलवर आणून १०१ चे दाखले ऑनलाईन देण्याचे, शासकीय कागदपत्रांकरीता पतसंस्थांना शासकीय कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देऊन अहमदनगर जिल्ह्याप्रमाणे पतसंस्थांनी जिल्हानिहाय स्थैर्य निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ही सहकार मंत्री जयंतराव पाटील यांनी केले.

यावेळी सहकार आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, प्रदेश उपाध्यक्ष सांगलीचे सुरेश पाटील, सुरेश वाबळे, सर्जेराव शिंदे, सुरेखा लवांडे, संग्राम पाटील,लक्ष्मण गायकवाड, रवींद्र बोरावके, रमेश शिंगटे, विशेष कार्यअधिकारी संतोष पाटील आदी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com