अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांची पोलीस चौकशी करणार! : गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुखअर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांची पोलीस चौकशी करणार!

मुंबई l Mumbai :

आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी तसेच महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत यांची पोलिसांकडून चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीच्या स्टुडिओचे काम अन्वय नाईक यांनी केले होते. या कामाच्या ८० लाख रुपयांच्या देयकाची रक्कम अर्णब गोस्वामी यांनी थकवल्यामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती.

यासंदर्भात त्यांनी चिठ्ठीही तसे लिहूनही ठेवले होते. नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांना धमकीचे दूरध्वनी हि आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल देतील. त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

तसेच अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणा प्रमाणे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचीही तातडीने चौकशी झाली पाहिजे. दोषींना ताबडतोब ताब्यात घ्या, अशी मागणी मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली.

कंगना रनौत हिने मुंबई आणि महाराष्ट्राची अपकीर्ती केल्या प्रकरणी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com