मुंबईत साकारणार लष्करी संग्रहालय

जागा निश्चित करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश
मुंबईत साकारणार लष्करी संग्रहालय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

भारतीय लष्कराच्या Indian Army गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घणारे, शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे असे राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत State War Memorial and Army Museum in Mumbai उभारण्यात येणार असून या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी दिले.

लष्करी संग्रहालय कसे असावे, यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा हे निश्चित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या सहभागासह एका सल्लागार आणि डिझाईनर समितीची स्थापना करण्यात यावी, अशी सूचना ठाकरे यांनी केली.

ते म्हणाले की, आपल्या आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या आपल्या जवानांप्रती अधिक माहिती मिळण्याच्यादृष्टीने या संग्रहालयात काही गोष्टींची अनुभूती घेता येईल अशीही व्यवस्था करण्यात यावी. बंकर कसे असतात, सियाचीनसारख्या ठिकाणी उणे डिग्री सेल्सीयसमध्ये आपले सैनिक कसे राहातात. जड शस्त्रास्त्रे सोबत घेऊन आपले सैनिक वाळवंटातून ते कसे चालतात.जंगलात त्यांचा वावर कसा असतो, यासारख्या गोष्टींची माहिती आणि अनुभव संग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांना मिळावा, असेही ठाकरे म्हणाले.

देशाचे लष्करी सामर्थ्य आणि गौरव दर्शवणाऱ्या या संग्रहालयाच्या माध्यमातून तीनही सैन्य दलाच्या पराक्रमाच्या यशोगाथा, विविध युद्धांची माहिती, यात वापरण्यात आलेले शस्त्राशस्त्र आणि आयुध यासह तीन ही सैन्य दलामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातील सैनिक, अधिकारी यांच्या पराक्रमाची माहिती, विविध युद्धात सहभागी होऊन शहीद झालेले राज्यातील सैनिक-अधिकारी, टँक, नौका, विमाने, पदके, लष्करी गणवेश, लष्करातील पदाधिकाऱ्यांचे रँक स्ट्रक्चर यासारख्या बाबी प्रदर्शित करण्यात याव्यात. युद्धात उपयोगात येणारी विमाने, नौका, हेलिकॉप्टर्स, रणगाडे यांच्या उभारणीसह इतर बाबींच्या प्रतिकृती येथे असाव्यात, असेही ठाकरे यांनी सांगितले.

येथे भारतीय स्वातंत्र्याची सर्व ऐतिहासिक माहिती मिळावी तसेच हे राज्य संग्रहालय होत असल्याने यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी कौशल्यांची माहिती, त्यांचे नौदल नियोजन याची माहिती देणारे दालन असावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

याशिवाय अम्फी थिएटर, नागरी सुविधा, परमवीरचक्र, अशोक चक्र विजेत्यांची माहिती त्यांचा पराक्रम, त्यांचे मेडल्स अशी सर्व माहिती याठिकाणी मिळावी. भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने त्यांना यासाठी करावयाची तयारी, याचे प्रात्यक्षिक ज्ञान देणारे काही कोर्सेस सुरु करता येतील का याचाही विचार केला जावा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. ब्रिगेडियर डॉ. शंकर Brigadier Dr. Shankar यांनी देशभरातील राज्य लष्कर संग्रहालयाची माहिती देणारे सादरीकरण यावेळी केले.

वर्षा वरील समितीकक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल एस.के. पराशर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस.चहल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.