अरुणाचल येथे सैन्य दलातील कोतूळचा जवान बेपत्ता

अरुणाचल येथे सैन्य दलातील कोतूळचा जवान बेपत्ता

कोतूळ (वार्ताहर) / Kotul - अकोले तालुक्यातील कोतूळ येथील रहिवासी व अरुणाचल प्रदेश मध्ये सैन्य दलात नोकरीस असलेला जवान राजेंद्र देशमुख हा अलीकडेच बेपत्ता झाला आहे.

राजेंद्र बाळासाहेब देशमुख (वय 39 वर्षे) रा. कोतूळ, ता. अकोले असे या जवानाचे नाव असून भारतीय सैन्य दलात भटिंदा, 111 रॉकेट रजिमेंट पिन 926111 C/0-56APO येथे हवालदार म्हणून सैन्यात सेवेत आहे. त्याची बदली अरूणाचल प्रदेश ईटानगर अरूणाचल प्रदेश एन.सी.सी. बटालीयन इटानगर पिन 791113 येथे झाल्यामुळे 15 दिवसांच्या रजेवर घरी आले होते. त्यानंतर दि. 26 जून 2021 रोजी ते आपल्या कर्तव्यावर रूजू होण्यासाठी कोतूळ वरून नाशिकला व तेथून रेल्वेने अरुणाचल प्रदेश इटानगर या ठिकाणी गेले. ते दि. 29 जून 2021 रोजी ईटानगर येथे कामावर हजर झाले.

त्यानंतर दि.29जून 2021 व 30जून 2021 रोजी तेथेच कॉरंटाईन राहिले. दि. 01जुलै 2021 रोजी रात्री 12.30 वाजता रेल्वेचे रिझर्व्हेशन करून इटानगर ते गुवाहटी पर्यंत त्यांनी प्रवास केला. त्यानंतर त्या दिवशी 1 जुलै 2021 रोजी गुवाहटी येथे सकाळी 08.45 वाजता त्यांनी आपल्या ए.टी.एम. मधून 5,000 रुपये काढल्याचे बँक खात्याची नोंद आढळते. त्यानंतर गुवाहटी पासून त्यांचा संपर्क तुटला आहे.

तो आजपर्यंत त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे झालेला सर्व प्रकार घातपात असल्याचा संशय पत्नी सुनीता राजेंद्र देशमुख यांनी व्यक्त केला आहे. कारण त्यांचा मोबाईल हा चालू असून त्यावर कोणी तरी त्रयस्थ व्यक्ती बोलत होती. ती नाव, गाव व इतर माहिती सांगत नाही. त्याला विचारले असता फोन मी विकत घेतला आहे आणि तो माझा आहे. या व्यतिरिक्त काहीच सांगत नाही. 2 दिवसानंतर तो फोन बंद असल्याचे लक्षात येते. पत्नीच्या तक्रारीवरून अरुणाचल प्रदेश मध्ये इटानगर पोलीस स्टेशन मध्ये मिसिंगचा गुन्हा दाखल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com