औरंगाबाद : जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद / aurangabad - येथील लष्करी छावणीतील मैदानावरील झाडाला गळफास घेत एका जवानाने आत्महत्या केली. मल्हार वन्नन राममुर्ती (वय-26, रा. कृष्णगिरी, तामिळनाडू) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. रविवारी (दि. 18) पहाटे साडेपाच वाजता सरावासाठी इतर जवान मैदानावर आले त्यावेळी हा प्रकार निदर्शनास आला. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.

मल्हार राममुर्ती हे पाच वर्षापूर्वी लष्करात भरती झाले होते. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादेतील छावणीत दाखल झाले होते. शनिवारी संध्याकाळी इतर सहकार्‍यांसोबत त्यांनी जेवण केले आणि सर्व जण झोपी गेले. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी सरावासाठी अधिकारी आणि जवान मैदानावर जाण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा राममूर्ती हे 169 ऑफिसर मेसच्या बाजूच्या बरॅकजवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

सुभेदार पोपट जाधव आणि इतर सहकार्यांनी तत्काळ राममूर्ती यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार भगवान वाघ करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com