महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीरचा वाढीव साठा मंजूर

महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीरचा वाढीव साठा मंजूर
रेमडेसिवीर

नवी दिल्ली -

केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाढीव साठा मंजूर केला आहे. 21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत राज्याला 4,35,000 रेमडेसिवीर पुरवण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन व रेमडेसिविर मिळावे अशी मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिवीर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवदीप रिनवा यांनी 24 एप्रिलला राज्य सरकारला पाठवले आहे.

पत्रात म्हटले आहे, यापूर्वी महाराष्ट्राला रेमडेसिविरचा जो साठा देण्याचा निर्णय घेतला होता त्याचा नव्याने आढावा घेतला असून महाराष्ट्राला 4,35,000 हजार रेमडेसिवीर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्राला 2,59,200 रेमडेसिवीर मंजूर केले होतेे. देशातील सात प्रमुख रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होणार्‍या 11 लाख रेमडेसिविरचा आढावा घेऊन यापूर्वी 21 एप्रिल ते 30 एप्रिलसाठीचे वाटप करण्यात आले होते. मात्र नव्याने यात वाढ होऊन सर्व कंपन्यांकडून 16 लाख रेमडेसिविर उपलब्ध झाल्यामुळे नव्याने सर्व राज्यांच्या रेमडेसिविर मागणीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्व राज्यांसाठी नव्याने रेमडेसिविर पुरवठ्याचे फेरवाटप करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्राला 21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीसाठी 4,35,000 रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुजरातला 1,65,000 रेमडेसिविर मंजूर करण्यात आले असून उत्तर प्रदेशला 1,61,000, दिल्ली 72,000, कर्नाटक 1,22,000, बिहार 40,000, आंध्र प्रदेश 60,000, राजस्थान 67,000, तामिळनाडू 59,000 आणि मध्य प्रदेश 95,000 हजार अशाप्रकारे 16 लाख उपलब्ध रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com