महाराष्ट्रासाठी आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती
महाराष्ट्रासाठी आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना
संग्रहित

नवी दिल्ली - महाराष्ट्रात करोना प्रादुर्भावाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा झाल्यामुळे इतर राज्यांतून ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे ऑक्सिजन आणण्यात येत आहे.

विशाखापट्टनमवरुन पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता गुजरातमधून महाराष्ट्र्च्या दिशेने आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन वाढवून मागितले होते. केंद्र सरकारने अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करत गुजरातमधून ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांनी म्हटले आहे, गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रातील कळंबोलीच्या दिशेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन रवाना झाली आहे. ही ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वे राज्यातील ऑक्सिजन साठा वाढवेल त्यामुळे कोरोना विरुद्धची लढाई लढण्यास मदत मिळेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com