परमबीर सिंग पुन्हा अडचणीत; खंडणीचा गुन्हा दाखल, सचिन वाजेचे देखील नाव

व्यापाऱ्याचे गौप्यस्फोट
परमबीर सिंग पुन्हा अडचणीत; खंडणीचा गुन्हा दाखल, सचिन वाजेचे देखील नाव

दिल्ली | Delhi

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former Mumbai CP Parambir Singh) पुन्हा अडचणीत आले आहेत. परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल (extortion case) करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police station) एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. व्यापाऱ्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

विमल अग्रवाल (Vimal Agrawal) नावाच्या हॉटेल व्यावसायिकानं दाखल केलेल्या तक्रारीत परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे (Sachin Waze), सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाझ भाटी यांची नावं नमूद केली आहेत. या सर्वांविरोधात खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान आरोपींनी विमल अग्रवाल यांच्याकडून ९ लाख रुपये रोख आणि सॅमसंगचे दोन महागडे फोन खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूण मिळून ११ लाख ९२ हजारांची खंडणी घेण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीची अगोदरच माहिती असल्याचा गौप्यस्फोट

"पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वीच सचिन वाजेने व्यापारी व बुकींसोबत मिटिंग केली होती. पोलिस दलात नियुक्त होण्यापूर्वीच वसुलीसाठी वाजेची व्यापारी, बार मालक आणि बुकींसोबत बोलणी सुरु होती" असे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. तसेच "परमबीर सिंग यांना रोजचं २ कोटीचं कलेक्शन हवं होतं, करोनामुळे वसुलीला फटका बसल्याने वाझेला हे टार्गेट दिले होते. वसुलीतील ७५ टक्के पैसे १ नंबरला तर २५ टक्के पैसे वाटून घेण्याचं प्लान ठरला होता" असा तक्रारदाराचा दावा आहे. करोना काळातील झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेतील कंत्राटदारांनाही वाजेने लक्ष्य केलं होतं, असं तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com