फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय धनजंय मुंडेनी घेतला मागे !
महाराष्ट्र

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय धनजंय मुंडेनी घेतला मागे !

या आधी देखील महाविकास आघाडीकडून फडणवीस सरकारच्या अनेक निर्णय रद्द करण्यात आले आहेत.

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

परदेश शिष्यवृत्ती मिळवण्याबाबत असलेली बंधने शिथिल करून महाविकास आघाडीने भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयाला धक्का दिला आहे. परदेश शिष्यवृत्ती मिळवण्याबाबत त्याच शाखेतून पदवी घेण्याबाबत असलेले बंधन शिथिल करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, "परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे. वयोमर्यादा पदव्युत्तर साठी ३५ वर्षे व पीएचडी साठी ४० वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. १४ ऑगस्ट पर्यंत दिलेली मुदतही वाढविण्यात येईल." असे त्यांनी म्हंटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com