‘जरंडेश्‍वर’ कारवाई : अण्णा म्हणाले, अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने...

ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी
‘जरंडेश्‍वर’ कारवाई  : अण्णा म्हणाले, अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने...

अहमदनगर / Ahmednagar - महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळा प्रकरणात ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातार्‍यातील जरंडेश्‍वर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या प्रकरणात अजित पवारांचे नाव आल्याने त्यांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra State Co-operative Bank (MSCB) scam case)

दरम्यान, यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांचं नाव आता आलं. आम्ही कधीपासून त्याबाबत बोलत आहोत. आता ईडीने (Enforcement Directorate (ED) लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल, असा दावा अण्णा हजारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

जरंडेश्‍वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आलं आहे. ते आम्ही कधीपासून बोलत आहे. पण मी फकीर माणूस. माझं कोण ऐकतोय. आता ईडीने लक्ष घातलं आहे. त्यातून सर्व बाहेर पडेल असा आम्हाला विश्‍वास आहे, असेही अण्णा म्हणाले.

अण्णा पुढे म्हणाले, राज्यात सहकार चळवळ वाढली. त्याचं अनुकरण देशानं केलं. मात्र, आज ही सहकार चळवळ मोडीत काढण्याचा डाव सुरू आहे. सहकार क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा डाव हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत, साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष आणि पार्ट्यांचं काही घेणं नाही. सहकार चळवळ टिकली पाहिजे. तिचं खासगीकरण होणं हा धोका आहे.

‘जरंडेश्‍वर’ कारवाई  : अण्णा म्हणाले, अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने...
मामाच्या साखर कारखान्यावर ईडीची कारवाई ; अजितदादा म्हणाले...

ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी

आता जरंडेश्‍वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही 4 हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे. आता ते सत्र न्यायालयात आहे. केस सुरू आहे. योगायोगाने आता हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असेही अण्णा म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com