
मुंबई | Mumbai
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. तसेच तुमचे आशीर्वाद असू द्या, अशी विनंती त्यांनी हात जोडून केली. यावर अण्णा हजारे यांनी ईश्वराचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचं म्हटलं.
तसेच एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याचीच ही पावती असल्याचंही हजारेंनी नमूद केलं. आम्ही राज्याच्या हिताचं काम करू. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.