संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परबांचा इशारा, म्हणाले...

संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परबांचा इशारा, म्हणाले...

मुंबई l Mumbai

एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST workers strike) पुकारला आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज सलग १७ वा दिवस आहे.

राज्य सरकारने वेतनवाढीची घोेषणा करताना कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं असं आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाची मागणी करत संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आला आहे.

तसेच संपातून कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायलयाची समिती जो निर्णय देईल त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

त्याच बरोबर, 'कामगार न्यायालयाने जर संप बेकायदेशीर ठरवला, तर अशी तरतूद आहे की एका दिवसाला आठ दिवसांचा पगार कापावा लागतो. कामगारांनी या सगळ्याचा विचार करावा. राज्य शासनाची अशी कोणतीच इच्छा नाही की, कामगारांचं आर्थिक नुकसान करावं. परंतु, जे संपावर आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नो वर्क नो पे हे तर करणारच, पण एक दिवसाला आठ दिवस कापणं हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. पण आम्हाला अशा कोणत्याही कारवाईला भाग पाडू नका, असं आवाहन मी कर्मचाऱ्यांना करत आहे. तसंच त्यांनी लवकरात लवकर कामावर यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com