अनिल गोटे, जितेंद्र ठाकुर राष्ट्रवादीत

अनिल गोटे, जितेंद्र ठाकुर राष्ट्रवादीत

धुळे  – 

माजी आ. अनिल गोटे व डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी त्यांच्या समर्थकांसह आज मुंबईत झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

माजी आ. अनिल गोटे यांनी महापालिकेच्या निवडणुकीपुर्वी भाजपाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी वेगळी चुल मांडुन महापालिकेची निवडणुक लढविली होती.

तसेच विधानसभा निवडणुक देखील त्यांनी लोकसंग्रामतर्फे लढविली होती. तर डॉ. जितेंद्र ठाकुर यांना विधानसभा निवडणुकीत भाजपातर्फे शिरपूर मतदार संघात तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपाचा राजीनामा देवून अपक्ष निवडणुक लढविली होती.

श्री. गोटे आणि डॉ. ठाकुर या दोघांनी त्यांच्या समर्थकांसह आज मुंबईत एका सोहळ्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

श्री. गोटे आणि डॉ. ठाकुर यांनी जि.प. निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे आता जि.प. निवडणुकीचे राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com