….तोपर्यंत ED च्या चौकशीला हजर राहणार नाही; अनिल देशमुखांची भूमिका

….तोपर्यंत ED च्या चौकशीला हजर राहणार नाही; अनिल देशमुखांची भूमिका

मुंबई | Mumbai

राज्याचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना चौकशीसाठी हजर होण्यास सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावले आहे.

मात्र पाचव्यांदा समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख (Anil deshmukh latest news) चौकशीसाठी ED समोर हजर झाले नाहीत. त्यामुळे देशमुख यांच्यावर लूक आऊट नोटीस (Look out notice) जारी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच अनिल देशमुख यांनी आज एक महत्त्वाचे निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे (Letter from former home minister anil deshmukh). त्यात त्यांनी ED समोर हजर होण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

न्यायालयीन चौकशी (Judicial inquiry) पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमूख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे. माझी ED च्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार असल्याचे ते म्हणाले.

त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया (Court proceedings) पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ED च्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असेही देशमुख यांनी आपल्या पत्रात लिहिले.

अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत ५ समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स २५ जून रोजी देऊन २६ जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ २६ जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे ३ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर ५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स ३० जुलै रोजी पाठवून २ ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कालचं (१८ ऑगस्ट) हे पाचव समन्स होत. १६ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना १८ ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com