राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाचा दणका!

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाचा दणका!

मुंबई | Mumbai

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह राज्य सरकारला (State Govt) मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दणका दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

सीबीआयने (CBI) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. तर अनिल देशमुख प्रकरणात दाखल गुन्ह्यातील दोन मुद्दे वगळावे या मागणीसाठी राज्य सरकारने केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.

सीबीआयला देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांसंबंधित पोलीस बदल्या आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या नियुक्तीबाबत तपास करण्याचा अधिकार आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठाने आज निकालपत्र जाहीर केले.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी या निकालाला दोन आठवड्याची स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र सौलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याला विरोध केला. न्यायालयाने राज्य सरकारची मागणी अमान्य केली. तसेच निकाल येईपर्यंत कागदपत्रे न मागण्याची सीबीआयची हमी देखील रद्द करण्यात आली. त्यामुळे आता सीबीआयचा तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख यांच्या वतीने एड अमीत देसाई यांनी अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र ही मागणी खंडपीठाने अमान्य केली. न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com