संगमनेर (वार्ताहर) -

राज्यातील प्राथमिक शाळांना जोडून अंगणवाडी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या

वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात प्राथमिक शाळेबरोबरच पूर्वप्राथमिक शिक्षणाचे वर्ग शाळेच्या आवारात सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहेत त्या धोरणा अंतर्गत तीन ते सहा वर्षाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने कार्यवाहीचे सूतोवाच केले आहेत त्यादृष्टीने राज्यात अंगणवाड्या या प्राथमिक शाळेच्या आवारात किंवा पाचशे मीटर जवळ असणे आवश्यक आहेत अशा स्वरूपात जोडणीची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रक्रियेत शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शालेय आवारात अंगणवाड्या असणे आवश्यक आहेत. सध्या पूर्व प्राथमिक स्तरावर शैक्षणिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांनी तयार करण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहेत.

ही बाब लक्षात घेऊन सर्व प्राथमिक शाळाशी जोडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने एकात्मिक बालविकास व शालेय शिक्षण विभाग यांनी नियोजन करून अशा स्वरूपात जोडण्यात आलेल्या अंगणवाड्यांची माहिती शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माहितीत तफावत

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत यु-डायस ऑनलाइन माहिती संकलित करण्यात येत आहेत. शाळेच्या आवारात पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध असल्यास संबंधीची माहिती देताना सुमारे 43 हजार अंगणवाड्या या प्राथमिक शाळेच्या आवारात सुरू असल्याचे संकलित माहिती दिसून येत आहेत. तथापि एकात्मिक बाल विकास विभाग अंतर्गत संकलित करण्यात आलेल्या माहितीनुसार अवघ्या सहा हजार बालवाड्या या शालेय आवाजाशी निगडित असल्याची माहिती उपलब्ध झाले आहे. या माहितीत तफावत असल्याने योग्य ती माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्टार प्रकल्पांतर्गत मिळणार साहित्य

शाळेच्या आवारात उपलब्ध असणार्या अंगणवाड्यांना आकार अभ्यासक्रम, पूरक शैक्षणिक साहित्य, सहाय्य, कार्यरत असलेल्या येथील कर्मचार्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण आणि सुविधा स्टार प्रकल्पाअंतर्गत व समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सदरची माहिती आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहेत. यामुळे येत्या काही वर्षात राज्यातील अंगणवाड्या मधून विद्यार्थ्यांना पोषण आहारा सोबतच शैक्षणिकदृष्ट्या तयार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.