अंगणवाडी महिला सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

पंकजा मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी
अंगणवाडी महिला सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

पुणे | प्रतिनिधी| Pune

भाजप सरकाराच्या काळात पंकजा मुंडे यांच्या मार्फत राज्यातील अंगणवाडी महिला सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते. त्या खरेदीची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी हवेली तालुक्यातील अंगणवाडी महिला सेविकांनी सोमवारी मोबाईल वापसी आंदोलन करत निषेध नोंदवला. अंगणवाडी सेविकांनी यावेळी हे मोबाईल हवेली पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना परत देऊन टाकले.

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच यावेळी भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

तत्कालीन भाजप सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविकांना १ लाख ५ हजार मोबाईल वाटप करण्यात आले होते. तेव्हापासून आज अखेर किमान ५० टक्के महिलांचे मोबाईल नादुरुस्त झाले आहेत. त्याचा येणारा खर्च संबधित महिलांना करावा लागत आहे. तसेच हे मोबाईल महिलांना देण्यापूर्वी एका गोडाऊनमध्ये २ वर्ष पडून होते, अशी माहिती समोर आली आहे आणि तेच मोबाईल आम्हाला देण्यात आले आहे.

कोट्यावधी रुपयांचा घोटाळा या मोबाईल खरेदीमध्ये झाला आहे. या सर्व प्रकरणी पंकजा मुंडे यांची चौकशी पाहिजे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली आहे. पगाराच्या निम्म्याहून अधिक खर्च मोबाईल आणि कागदपत्रा करता आमच्या महिलांना होतो. तो आम्हाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही हवेलीमधील २५० मोबाईल अधिकाऱ्यांना देऊन निषेध व्यक्त करत आहोत. आता आम्हाला या सरकारने उत्तम दर्जाचे मोबाईल आणि त्यामध्ये मराठीमध्ये अॅप द्यावे, अशी मागणीही शुभा शमीम यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com