Viral Video: महामार्गावर कारच्या धडकेत जखमी वाघाचा दुर्दैवी मृत्यू

Viral Video: महामार्गावर कारच्या धडकेत जखमी वाघाचा दुर्दैवी मृत्यू

गोंदीया | Gondia

महाराष्ट्रातील गोंदिया (Gondia) जिल्ह्यात एका वाहनाच्या धडकेत एक वाघ गंभीर जखमी (Tiger Death)झाल्याची घटना घडली आहे. या गाडीने वाघाला जोरदार धडक दिल्यामुळे या वाघाचा काहीवेळातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सगळ्याचा घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ही घटना गोंदीया शहरातील कोहमारा महामार्गावरील मुर्दोली (Murdoli) परिसरामध्ये रात्री घडली. रात्री या रस्त्यावरुन एक गाडी जात असताना हा वाघ रस्त्याच्यामध्ये आल्याने कारच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता. या जखमी वाघाला उपचारासाठी नेत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला. मुर्दोली परिसरात नेहमी वाघांचा वावर असतो, परिसरात हायवे मुळे नेहमी वन्य प्राणी मृत्यू मुखी पडतात व एखाद्या घटनेत वाघ पण जावू शकतात याची आधीच शक्यता वर्तवली होती. नागझिरा - नवेगाव कॉरिडॉर मधील पूर्व नागझिरा परिसरातून जातो आहे.

वाघ हा नागझिरा तील T१४ वाघिणीचा २ वर्षाचा निम्नवयस्क बछडा होता. या घटनेता व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यामध्ये वाघ जखमी झालेला दिसत आहे. तो कसाबसा रस्ता पार करण्याचा प्रयत्न करतो. जबर बसलेल्या धडकेमुळे वाघाला खूप दुखापत झाल्याचंही दिसत आहे. दुर्देवानं या धडकेत झालेल्या जखमेमुळे वाघाचा मृत्यू झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com