उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर पत्नी अमृता यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर पत्नी अमृता यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी (Honorary Doctorate Degree from the University of Koyasan) जाहीर झाली आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवीचा मान मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसांना डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्यानंतर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, " देवेंद्र फडणवीस यांना आता पदवी दिली पण मला लग्न झाल्यापासून माहीत आहे की ते डॉक्टर आहेत, ते पॉलिटिकल डॉक्टर आहेत." मला लग्न झाल्यापासून माहिती आहे'.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर पत्नी अमृता यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...
Sharad Pawar : केंद्र सरकारच्या कांदा खरेदीच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

कँसरमुक्त महाराष्ट्र अभियानाविषयी सांगताना म्हणाल्या, '४ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिला टप्पा सुरु केला. अखिल भारतीय जैन महासंघाने सुरु केला. अनेक शिबिरे झाली. आता दुसरा टप्पा सुरु होतोय. ५० हजार लोकांना या उपक्रमात सामील करून घेण्यात येईल'.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर पत्नी अमृता यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...
Sharad Pawar : "मी कृषिमंत्री असताना कधी..."; मुख्यमंत्री शिंदेंच्या 'त्या' टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस सध्या पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांची माहिती घेण्यासाठी आणि महाराष्ट्रात एफडीआय आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी फडणवीस जपानच्या दौऱ्यावर असून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com