
मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा धक्का दिला आहे.आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीचा निकाल आता हाती आला असून यात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे...
अंबेजोगाई बाजारसमितीच्या निवडणुकीमध्ये एकूण अठरा जागांपैकी तब्बल १५ जागांवर मविआने बाजी मारली आहे. तर फक्त तीन जागांवर भाजपचा विजय झाला असून एका जागेचा निकाल अद्याप बाकी आहे.
दरम्यान, या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ही निवडणूक मविआच्या पॅनलमध्ये धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. त्यानंतर आज अखेर या निवडणुकीचा निकाल हाती आला असून महाविकास आघाडीने या निवडणूकीत बाजी मारली आहे.