कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उडाली खळबळ; भाविकांसाठी दर्शन बंद

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उडाली खळबळ; भाविकांसाठी दर्शन बंद

कोल्हापूर l Kolhapur

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिर भाविकांसाठी आजपासून खुले केले आहे. मात्र. कोल्हापूर (Kolhapur ) येथून एक खळबळजनक वृत्त हाती आहे.

कोल्हापूर अंबाबाई मंदिर (Ambabai Temple Kolhapur) परिसरात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीमुळे कोल्हापूर पोलीस सतर्क झाले असून बॉम्बशोधक पथकाकडून बॉम्बचा शोध घेतला जात आहे. (Kolhapur Bomb Threat Call)

दरम्यान घातपात करण्याचा निनावी फोन आल्याने पोलिसांनी तातडीने दर्शनाची रांग थांबविली. पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिसदेखील मंदिरात दाखल झाले आहेत.

Related Stories

No stories found.